blogs

Tuesday, 28 August 2012

मराठी विनोद

चिंगी आणि मन्या बागेत बसले होते...
चिंगी: मी आई होणार आहे...

मन्या: नाssssही असे कसे शक्य आहे?? आपण तर...

...चिंगी: ए बावळट तुझ्या बाबांनी मला propose केलं, आता मी तुझी आई होणारआहे
 
 
 
 
 
 
दोन मित्र अनेक वर्षांनी भेटतात.
पहिला मित्र: अरे तुझं लग्न झालं की अजून ही हातानेच स्वयंपाक करतोस?
दुसरा मित्र : तुझ्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर 'होय' असंच आहे
 
 
 
 
डॉक्टर (शीलाला) : तुमच्या नवर्‍याची स्मृति गेली आहे.

शीला : यावर उपाय काय ?

डॉक्टर : ज्या घटनेमुळे यांची स्मृति गेली आहे, ती घटना यांच्याबरोबर पुन्हा घडवली पाहिजे .
...
शीला : (घाईघाईने) जारे पिंट्या , स्व्यमपाकघरातून लाटण घेऊन ये !!!
 
 
 
 
लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला, ''तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स होती!''

नवरी उत्तरली, ''वाटलंच होतं मला. आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच 'गुण' जुळले असणार ना!!!!!'





पत्नी - माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला चैन गिफ्ट द्या.

पती - जरुर देईन, बोल कोणती हवी सायकलची का मोटर सायकलची...




नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा...





प्रेमिका :- तु लग्ना नंतर सुद्धा मला असेच प्रेम करशील ?

प्रेमी :- हो, जर तुझ्या नव-याने परवांगी दिली तर.





झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता? मुलगी : एम. जी. रोड झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!



एके दिवशी काय झाहले…. बोंबील म्हणाला सुरमाईला- आय लव्ह यू, मी तुझ्यासाठी ‘वेटिंग’ आहे!! सुरमई म्हणाली बोंबलाला- . . . . . . . . . . . . . सॉरी, माझी बांगड्याबरोबर ‘सेटिंग’ आहे!!





एका पोलीसाच्या घरात चोर शिरतात.
त्याच्या बायकोला याची चाहूल लागते.
बायको : अहो, उठा. उठा की. चोर शिरलेत घरात.
पोलीस : च्यायला, गप ए. मी आत्ता ड्युटीवर नाहीये



तो तीला म्हणाला , ” क्या हुआ तेरा वादा … “
.
.
.
तो तीला म्हणाला , ” क्या हुआ तेरा वादा … “
ती म्हणाली,
” आता मी दुसरा पकडलाय,
आज पासुन तु माझा दादा…”





शिक्षक :- मुलांनो,

सांगा बघू


आपल्या देशात सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो?
चिंटू :- दारूच्या ग्लासात …!!!



बाई :- कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला? विद्यार्थि :- आई ने सांगितले बस बघुन रस्ता ओलांड , पण अर्धा तास झाला बसच गेलि नाहि म्हणुन उशिर झाला



सरांनी वर्गात मुलांना गवत खाणाऱ्या गाईचं चित्र काढायला सांगितलं. बाळ्या नुसताच बसून होता. सरांनी त्याला विचारलं : सर : काय रे, मी तुला गवत खाणाऱ्या गाईचं चित्र काढायला सांगितलं होतं ना? बाळ्या : हे काय काढलंय. सर : अरे पण हा कागद कोरा आहे ! बाळ्या : पण सर, गाईने गवत खाल्लंय, त्यामुळे गवत संपून गेलंय. सर : अच्छा, मग गाय कुठे आहे? बाळ्या : काय सर, गवत खाल्ल्यावर गाय इथे कशाला थांबेल. ती दुसरीकडचं गवत खायला निघून गेली आहे !!!



एकदा शाळेत शिक्षक मुलाला विचारतात. "सांग धनुष्यबाण कोणी मोडले?" त्यावर तो मुलगा बोलतो "खरचं सांगतो सर मी नाही मोडले". तेवढ्यात वर्गात हेडमास्तर येतात. शिक्षक त्यांना सांगतात सर या मुलाला धनुष्यबाण कोणी मोडले ते माहीत नाही. त्यावर हेडमास्तर बोलतात, "जावू द्या हो, जुने झाले असेल त्यामुळे मोडले असेल".



गुरुजी : १५ माणसे एका दिवसात एका बागेची सफाई करतात. तर मग ३० माणसे त्या बागेची सफाई किती दिवसात करतील. अमित : काय गुरुजी ! एकदा जर बाग साफ झाली आहे मग परत ती बाग साफ करायची काय गरज आहे?





बाई :- राजु , कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला? राजु :- बाई माझे ना रस्त्यात पाच रुपये सांडले, ते शोधत होतो म्हणुन वेळ झाला. बाई :- गप्पु तुला का उशिर झाला? गप्पु :- मि त्याच्या पाच रुपयावर पाय ठेउन उभा होतो ना...






 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment