blogs

Thursday, 20 September 2012

मराठी विनोद

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला? बंड्या – काय करणार बाईक खराब झाली होती सर. हेडमास्तर – बस ने येता येतं नव्हतं का गधड्या??? … बंड्या – मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ






डॉक्टर - तुम्हाला मलेरिया झाला आहे.रुग्ण- खरंच मलेरिया झाला आहे ना? कारण एकदा डॉक्टरने दिलेल्या मलेरियाच्या औषधामुळे एक रुग्ण टॉयफाइडमुळे  मृत्यू पावला होता. डॉक्टर - नाही, माझ्या औषधीमुळे मलेरियानेच रुग्ण मरतात.
 
 
 
बायको – अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे. नवरा – कशावरून??? . …. . . . . बायको – अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये
 
 
बंता - आॅक्सिजन हा वायू सजीवाला जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. या वायूचा शोध १७७३ मध्ये लागला होता. संता- अरे देवा! बरं झालं, आॅक्सिजनचा शोध लागण्यापूर्वी माझा जन्म झाला नाही.
 
 
 
एका पार्टीत उंदीर आणि मांजर मिळून ड्रिंक्स घेत असतात.मांजर : आज जर पार्टी नसती ना तर मी तुला खाऊनच टाकलं असतं.उंदीर : ए..... माझं डोकं नको फिरवू हं.... ...चालायला लाग येथून.... नाही तर लोक म्हणतील मी नशेत बाईमाणसावर हात उचलला म्हणून.
 
 
सर :  होमवर्क का नाही केले?मुलगा : सर लार्ईट गेले होते.सर :  मेणबत्ती लावायची मग.मुलगा : काडीपेटी नव्हती.सर : का, काय झाली?मुलगा : देवघरात होती.सर : घ्यायची मग.मुलगा : अंघोळ नव्हती केली. सर : का नाही केली?मुलगा : पाणी  नव्हते.सर : का?मुलगा : मोटार चालू होत नव्हती.सर : का?मुलगा : आधीच सांगितले ना की लाईट गेलेले म्हणून.
 
 
 
शाळेचे तपासनीस एका शाळेवर तपासणीसाठी जातात. तपासनीस : बाळा तुझे नाव काय? विद्यार्थी : पांडू. तपासनीस : अरे बाळा, पांडू नाही, पांडुरंग असे सांगावे.तपासनीस दुसर्‍या मुलाला विचारतात, तपासनीस : आणि बाळा तुझे नाव काय? दुसरा विद्यार्थी : बंडुरंग.
 
 
 
किशोर आपला आजारी मित्र विनोदला भेटायला गेला.किशोर : आता तब्येत कशी आहे?विनोद : आता खूप बरे वाटतेय मित्रा.किशोर : मग त्रास वगैरे काही नाही ना?विनोद : खोकला तर पूर्णपणे थांबलायं मात्र श्वासाचा त्रास आहे.किशोर : अजिबात काळजी करू नकोस मित्रा, श्वासपण थांबेल
 
 
 
किशोर : आई, आई मला एक ग्लास रस दे बघू. आई : अरे, रात्रीचे किती वाजलेत? आणि या वेळी रस? किशोर : पण आई, काल बाबांनीच तसं सांगितलंय. आई : काय सांगितलं बाबांनी? किशोर : बाबा म्हणाले, ‘किशोर, अभ्यास करताना जरा रस घेऊन करत जा.’
 
 
 
संता : हॅलो, पोलिस स्टेशन,पोलिस स्टेशन : हॅलो, बोला काय झाले?संता : मला फोनवर धमक्या येत आहेत, पोलिस स्टेशन : कोण धमक्यादेत आहेत? कोण आहेत ते?संता : मला टेलिफोनवाले धमक्या देत आहेत, पोलिस स्टेशन: काय म्हणताहेत?संता : ते माझ्यावर रागवून म्हणत आहे की, बिल नही भरा तो काट देंगे.
 
 
 
 
 
एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते,” आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का??????? मुलगा थोडा वेळ विचार करतो…….तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो,” हे बघ, बोअर करु नकोस.
 
 
भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो …! . . . . …. .घरमालक:- अरेSSS…..!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?
 
 
 
एक गृहस्थ आपल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले व म्हणाले,गृहस्थ : माझ्या मुलाने चावी गिळली हो.डॉक्टर : त्याने चावी गिळून किती वेळ झाला?गृहस्थ : दहा दिवस झाले असतील.डॉक्टर : काय? दहा दिवस ...इतक्या दिवसांनंतर माझ्याकडे आणताय?गृहस्थ : इतके दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती, आजच हरवली.
 
 
एक सभ्य माणूस दिवसा फिरणा-या डासाला बघून म्हणाला, ‘काय रे, तू तर रात्रीचा येत असतोस. मग आता का आलास?’डास म्हणाला,  ‘मार्च महिना आहे ना! टार्गेट पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाइम करतोय!
 
 
 
मुलगा शाळेतून मधूनच घरी आल्यावर वडिलांना म्हणतो, मी उद्या शाळेला जाणार नाही.बाबा - का रे, काय झाले?मुलगा - आज आमच्या स्कूलमध्ये आमचे वजन केले.वडील - मग त्याचा स्कूलमध्ये न जाण्याचा काय संबंध?मुलगा - काय माहीत! उद्या आम्हाला विकूनही टाकतील.
 
 
 
संता - आई मी केबीसी मधून बोलतोय. माझ्या वडिलांचे नाव काय आहे. आई - प्रश्न किती रुपयासाठी आहे. संता - एक हजार रुपयासाठी. आई - जाऊदे मग क्विट कर उगाच घरात तलवारी उपसल्या जातील.
 
 
 
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात. channel वर म्हैस दिसते…. नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक . …. . . . . . . . बायको : Aiyyaaaaaa… सासूबाई !!!!!
 
 
 
मुलगा - आई तू पूर्वी सर्कसमध्ये काम करत होतीस का? आई - नाही , काय झाले ? मुलगा - मग सगळे लोक असं का म्हणतात की तू पप्पांना बोटावर नाचवतेस म्हणून.
 
 
बायको रागाने नवऱयाला म्हणते, असे चोरी करणारे नोकर घरात कशाला ठेवले आहेत, नवरा विचारतो काय झाले, बायको म्हणते आहो तुम्ही काल हॉटेल मधुनजी चांदीची प्लेट उचलून आणली होती ती त्या नोकराने गायब केली आहे.
 
 
 
 
मालकीण आपल्या मोलकरणीला म्हणते, मला असे वाटतंय की तुमचे मालक ऑफिसमध्ये कोणत्या तरी दुसऱया बाईच्या प्रेमात पडले आहेत. त्यावर मोलकरीण म्हणते, असे नका म्हणू बाईसाहेब ते मला असा धोका नाही देऊ शकत.
 
 
 
 
 
बायकोला कंटाळून नवरा तिला म्हणाला तू जर पाच मिनिट शांत बसलीस, तर मी तुला पाचशे रुपये देईन. बायको शांत बसली. कशीबशी दोन मिनिटे होत नाहीत, तोवर बायको म्हणाली जरा घड्याळात बघा बर पाच मिनिटे झाली का ?
 
 
 
 
एक गृहस्थ सायकल चालवत असतो, मागच्या सीटवर बसलेला त्याचा मुलगा मोठ्याने रडत असतो, ते पाहून रस्त्यावरून जाणारा माणूस त्यांना म्हणतो तुमचा मुलगा रडतोय आणि तुम्ही तसेच जाताय, तो गृहस्थ म्हणतो, अहो मीच त्याला रडवले आहे कारण माझ्या सायकलला घंटी नाही.
 
 
 
 
 
गंपूचा मुलगा : बाबा...आपल्या सोसायटीत स्विमिंग पूल बांधायचा. माझे मित्र तुमच्याकडे मदत मागायला येणार आहेत. गंपू : ओके...त्यांना दोन बादल्या भरुन पाणी देऊन टाक.
 
 
 
 
शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले, ” महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?” … ” अगं काही नाही … हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता”
 
 
 
 
एक माकड (दुसऱ्या माकडाचा हात बघून) मला तुझ्या भविष्यात अंधार दिसतोय! दुसरं माकड: का? पाहिलं माकड: तू पुढे माणूस बनणार आहेस !!!
 
 
 
 
बंटीचा निबंधगुरुजी - बंटी तू "माझा कुत्रा" या विषयावर लिहिलेला निबंध अगदी तंतोतंत तुझ्या भावाने लिहिलेल्या निबंधाप्रमाणे आहे. तू त्याची नक्कल केलीस की काय?बंटी- नाही गुरुजी .... पण आमच्यादोघांचा कुत्रा एकच होताना.....
 
 
 
 
 
परीक्षेच्या RESULT नंतर: जर चांगले गुण मिळून पास झाला तर… शिक्षक: मी शिकवलंय म्हणून आई: सगळी देवाची कृपा …बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच … मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि… जर नापास झाला तर…. शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस . पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच…. सगळे बदलतात पण मित्र नाही.
 
 
 
गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते …… त्यात एक कुत्रा हि नाचत होता…. लोकांनी विचारले ” तू का खुश आहेस ? ” ……… त्यावर कुत्रा म्हणाला ” वीज येईल तर खांब पण लागतील ना !!!
 
 
 
 
 
शिक्षिका (विद्यार्थ्यास)- असा कोणता प्राणी आहे, जो सर्वाधिक अंडी देतो? विद्यार्थी- मॅडम, आमचे गणिताचे सर, कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली.
 
 
 
संजू- माझे आजोबा सध्या पाऊणशे वर्षांचे आहेत, पण त्यांच्या डोक्यावर तुम्हाला एकही पिकलेला केस आढळून येणार नाही. मंजू - म्हणजे अजूनही त्यांचे केस काळेभोर आहेत? संजू- नाही गं! त्यांचं डोकं जर संपूर्णपणे टकलांन व्यापलेलं आहे, तर त्यावर काळे केस तरी कसे शिल्लक असतील?
 
 
 
 
छोट्या चिंटूनं विचारलं, "आई, माझी किंमत किती आहे गं? आई- बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे. चिंटू- मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?
 
 
 
 
शेतकरी - (जनावरांच्या डॉक्टरला) डॉक्टर साहेब माझी गाय वाळलेल्या चा-याला तोंड लावत नाही तिला ओलाच चारा लागतो. पण, सध्या ओला चारा मिळत नाही म्हणून ती खराब झाली हो. मी काय करू डॉक्टर - सोपे आहे. तिच्या डोळ्याला हिरवा चष्मा लाव.
 
 
 
 
पती - (पत्नीला) मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही. पत्नी - (पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.
 
 
 
 
 
रमेशच्या पायात रोज नवीन चप्पल पाहून सुरेश त्याला विचारतो. सुरेश- काय रे, तू रोज नवीन नवीन चप्पला वापरतो? तुला वडील घेऊन देतात का रे? रमेश- नाही रे, ही सारी मंदिरात जाणार्‍या भक्तांची कृपा....
 
 
 
 
शिक्षक (विद्यार्थ्याला) -- 'कुतुबमीनार कोठे आहे.' विद्यार्थी -- 'माहित नाही.' शिक्षक-- 'बेंचवर उभा रहा.' विद्यार्थी-- 'सर, कुतुबमीनार अजून दिसले नाही.'
 
 
 
 
शिक्षक : सांगा बर, मुलांनो अकबर बादशाहने कुठंपर्यंत राज्य केलं? सुनील : सर, मी सांगतो. पान नंबर 14 ते पान नंबर 25!
 
 
 
 
आई : बाळा शाळेतून लवकर का आलास? बाळ : मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठविले. आई : अरे पण संजयला का मारलेस? बाळ : मला लवकर घरी याचचे होते म्हणून!!!!
 
 
 
वडील (मुलाला) : तू मघापासून कोंबडा का झाल आहेस? मुलगा : बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की जे काम शाळेत करशील तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून !
 
 
 
नन्या : आई आई, मन्या येतोय. आधी सगळी खेळणी आत ठेवूयात. आई : का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का? नन्या : नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!!
 
 
 
रस्त्यावर एका जाड बाईला बघून एक मुलगा थांबला. बाई- मला बघून थांबलास का? मुलगा- मावशी, समोरच्या पिवळ्या बोर्डवर लिहिलेले आहे की जड वाहनांना अगोदर जाऊ द्या म्हणून.
 
 
 
 
आई : पिंटू तुझा पाय जास्त दुखत असेल तर ही गोळी घे, दुखणं कमी होइल. पिंटू : अगं आई पण गोळीला कसं माहिती माझा कोणता पाय दुखतो आहे ते.
 
 
 
 
आई- बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं. तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास. बाळू- आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं, की फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे.
 
 
 
सोनू : आई मला सगळे देव मानतात. आई : का? सोनू : मी बागेत गेलो तर मला बघून सगळे एकदम बोलले- अरे देवा तू पुन्हा आलास?.
 
 
 
 
शिक्षिका - चिंटू, तुला ५० मार्क देताना मला आनंद होतोय. चिंटू - मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता. शिक्षिका- ते कसे? चिंटू - पूर्ण १०० मार्क देऊन.
 
 
 
 
शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते. शिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते. बंड्या : आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे.
 
 
 
 
शिक्षक : मी एका माणसाला ठार मारले आहे, या वाक्याचा भविष्यकाळ काय? बंड्या : तुम्ही जेलमध्ये जाल.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment