blogs

Monday, 12 November 2012

मराठी म्हणी

अंगापेक्षा बोंगा जास्ती.

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

अडला हरी धरी गाढवाचे पाय.

अडली गाय खाते काय.

अती तिथं माती.

अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.

असतील शिते तर नाचतील भूते.

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

तहान  लागल्यावर विहीर खणणे.

आधी पोटोबा, मग विठोबा.

आपला तो बाळ्या दुसऱ्याचा तो कार्ट्या.

आपला हात, जग्गन्नाथ.

आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.

आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.

आयत्या बिळात नागोबा.

उंदराला मांजराची साक्ष.

उचलली जीभ लावली टाळूला.

उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.

उथळ पाण्याला खळखळाट फार.

उस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.

ऐकटा जिव सदाशिव.

ऐकावे जनाचे करावे मनाचे.

असेल दाम तर हो‌ईल काम.

आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.

आ‌ई भाकर देआ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
आधी करा मग भरा.

आधी नमस्कार मग चमत्कार.

आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.

आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.

आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.

आरोग्य हीच धनसंपत्ती.

आली अंगावर, घेतली शिंगावर.

आलीया भोगासी असावे सादर.

आळश्याला दुप्पट काम.

ओल्या बरोबर सुके जळते.

औषधावाचून खोकला गेला.

No comments:

Post a Comment