blogs

Thursday, 21 March 2013

पैसे कमवा आणी वाढवा

**** आपल्या सर्वांनाच खूप खूप पैसे कमवायचे असतात. पण त्यासाठी नक्की काय करावे याबाबत मनात गोंधळ असतो. त्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग होईल असे वाटते.****

1) स्वत:च्या ख-या गरजा ओळखा- आपण उत्साहाच्या भरात कधी कधी अनावश्यक गोष्टींचीही खरेदी करतो. हे टाळण्यासाठी महिन्याच्या जमाखर्चाचे अंदाजपत्रक बनवणे व त्याप्रमाणे खर्च करणे हा एक उपाय आहे.

2) आर्थिक नियोजन करा- ब-याच जणांना आर्थिक नियोजन कंटाळवाणे वाटते किंवा आहेच किती उत्पन्न/बचत असाही विचार केला जातो. कर भरायच्या वेळेसच अनेक जण आर्थिक सल्ला घेतात. जर योग्य नियोजन असेल तर थोड्या उत्पन्नातही मोठी गुंतवणूक होऊ शकते.

3) जोडव्यवसाय करायचा विचार करा- आपली नोकरी/व्यवसाय याशिवाय जिथे तुमची उपस्थिती आवश्यक नसेल असा एखादा जोडव्यवसाय करा.

4) दुस-या पिढीतील उत्पन्न वापरा- तुमचा पगार हे पहिल्या पिढीतील उत्पन्न मानले तर त्यातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हे दुस-या पिढीतील उत्पन्न होय.

5) अशक्य परताव्याची अपेक्षा ठेवू नका- शेअर बाजारात तेजी-मंदीची चक्रे येतात. तुमच्या आर्थिक सल्लागाराशी विचारविनिमय करून वास्तविक परताव्याची अपेक्षा ठेवा.

6) कर्ज घेऊ नका व घेतल्यास लवकर फेडून टाका- कुठलेही कर्ज, ग्रहकर्ज धरून घेऊच नका व घेतल्यास लवकर फेडून टाका .

7) पैसे वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवा- आपण गुंतवणुकीचाही तोल सावरायला हवा. म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड्स, पोस्ट, सोने अशा निरनिराळ्या साधनांमध्ये पैसे गुंतवा.

8) लवकर सुरुवात करा- जे लवकर बचतीला सुरुवात करतात त्यांना पुढे आयुष्यात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यताही कमीच असते.

9) पुरेसे विमा संरक्षण घ्या- ‘मला काय होणार’, ‘पुढे बघू’ असा विचार करू नका. आपल्यावर अवलंबून असणाºया व्यक्तींप्रमाणे पुरेसे विमा संरक्षण घ्या.

10) गरजेप्रमाणे आर्थिक नियोजन बदला- लग्न न झालेल्या मुलाच्या आर्थिक गरजा व एक मूल असलेल्या माणसाच्या आर्थिक गरजा नक्कीच वेगळ्या असतील. त्याप्रमाणे आपले आर्थिक नियोजनही बदला.

No comments:

Post a Comment