blogs

Thursday, 10 October 2013

माजा तुज्यावं भरोसा हाय





माजा तुज्यावं भरोसा हाय.......!!ध्रु!!
नाखवा गेलाय वारांडोलीला
अवचित सुटलाय वादळी वारा
सारा दर्या फेसाळला
लाटा भिड़ती आभालाला
अंधार पड़लाय काही दिसत नाय...
येता संकट उभी तू रहाय..
माजा तुज्यावं भरोसा हाय.......!!१!!
पोरा-बालांचा संसार माजा
दूर संकटी दर्या चा राजा
आई सांभाळ कर तू त्याचा र
ाख मान तुज्या भक्तांचा
तुज्याविना मला कोण आई...
तार णार मला हाय...
माजा तुज्यावं भरोसा हाय....!!२!!
नाखवा येऊ दे घरी परतुनी
पूंजा करीन तूजी जोर्यांशी
ओटी भरीन खन -नारलानी
आरती करीन मुद-कापरानी
मलवट भरिन तुज़ं धरुनी पाय..
येता संकट उभी तू रहाय..
माजा तुज्यावं भरोसा हाय....!!३!!
संगती घेउन जगदीश बंदवाला
आम्ही येऊ तुजे जत्रला
नवस फेडींन तुजे होमाला
मी नाचन गं पालखीला
परशुराम कवन गाय ...
येता संकट उभी तू रहाय..
माजा तुज्यावं भरोसा हाय....!!४!!

No comments:

Post a Comment