blogs

Wednesday, 25 January 2023

मराठी सुंदर सुविचार

*देव आहे की नाही*

*याचा शोध घेण्यापेक्षा*

*आपण माणूस आहोत की नाही*

*याचा शोध घ्या 




कपट और पाप*

*उतना ही करना चाहिए,* 

*जितना भुगतने का सामर्थ्य हो*

*क्योंकि कुदरत किसी को नही*

*छोड़ती इतना स्मरण रखना...!* 

*🌹🌹🌹🌹*





*इंसान की सबसे बड़ी हार*

*उसी वक्त हो जाती है,* 

*जब खुद सही होकर भी*

*गलत लोगों के आगे सिर*

*झुका लेता है....!!* 

*🌹🌹🌹🌹*





: *कुछ लोग आपसे नफरत*

*इसलिए करने लगते है*

*क्योंकि आपकी सही बात* 

*उसे कड़वी लग जाती है..!!* 

*🌹🌹🌹🌹*





 *आयुष्यात विश्वास फक्त*

*देवावर ठेवावा आणि प्रेम*

*आपल्या कामावर करावं*

*कारण हे दोघेही तुमची*

*कधीच फसवणूक करत नाही.!* 

*🌹🌹🌹🌹*





: *तुलना आणि इर्षा करण्यात आपला किंमती वेळ वाया घालवू नका , कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो...*


*🙏🙏*




 *आपले साईबाबा सांगतात*

*दुसऱ्याला देण्यासाठी*

*आपल्याजवळ काही नसलं*

*तरी चालेल पण...* 

*"सन्मान" देता आला पाहिजे*

*🌹🌹🌹🌹*

*🌹🌹🌹*


*आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही, अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो.*



ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात,

तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.



मोठी स्वप्ने पाहणारीच

मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.



एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो.


मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी

स्वतःलाच चालावे लागते.



दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे.

तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.



कामाचा खूप व्याप असतानाही

आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच

खरी मैत्री.



नेहमी उच्च ध्येय ठेवा,

ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.



ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही,

याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.



रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे

मौन



भेकड म्हणून जगण्यापेक्षा

शुराचे मरण कधीही चांगले.



आपण फक्त आनंदात रहावे,

कारण

आपल्याला दुःख देण्यासाठी

अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.





Motivational Quotes in Marathi



काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते,

कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.



मैत्री हि वर्तुळासारखी असते,

ज्याला कधीच शेवट नसतो.



थेंब कितीही लहान असला तरी

त्याच्यात अथांग सागरात

तरंग निर्माण करण्याची क्षमता असते.

त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.



प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे,

कुठल्याही फालतू माणसाकडून

त्याची अपेक्षा धरू नका.



मनुष्याची आर्थिक स्थिती

कितीही चांगली असली

तरीही

जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी

त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.



स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा,

जे गटारीत पडले तरी

त्याचे मोल कमी होत नाही.



परीक्षा म्हणजे

स्वतः च्या आत

डोकावून पाहण्याची संधी.



धैर्यहीन मनुष्य

तेलहीन दिव्यासारखा असतो.



आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते,

फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.



यशाची गुरुकिल्ली म्हणजे

स्वतः ला ओळखणे.



नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही,

ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.



तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या...

मग

आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.



स्वतःला कमजोर समजणे

हि मोठी चूक आहे.



स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय

आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.



जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात,

ज्यांना यशस्वी व्हायचे असेल,

ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.



भविष्याचा अंदाज घेण्याचा

उत्तम मार्ग म्हणजे

तो तयार करणे.



कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही,

त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.



ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे

त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.



आपण जोवर काही करत नाही

तोवर सर्व अशक्य दिसते.



जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत,

तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.



स्वतःची वाट स्वताच बनवा,

कारण

इथे लोक वाट दाखवायला नाही तर

वाट लावायला बसलेत.



आयुष्यात काही शिकायचे असेल

तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.



विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.



शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.



चांगला माणूस घडवणे

हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.



समुद्रात कितीही मोठे वादळ आले

तरी

समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.



आपण जे पेरतो तेच उगवतं.



सरावानेच अचूकता निर्माण करता येते.



गरज ही शोधाची जननी आहे.



जिथं आपली कदर नाही,

तिथं कधीही जायचं नाही.


ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो,

त्यांची मनधरणी करत बसायचे नाही.


जे नजरेतून उतरलेत,

त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.



कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही,

आणि

यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.



मोत्याच्या हारापेक्षा

घामाच्या धारांनी

मनुष्य अधिक शोभून दिसतो.



तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे,

त्याविषयी कमी बोला,

आणि

ज्या विषयाची माहिती नाही, त्या विषयी मौन पाळा.



संकटं तुमच्यातली

शक्ती, जिद्द

पाहण्यासाठीच येत असतात.



सौंदर्य हे वस्तूत नसते,

पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.




Suvichar Marathi Status


कामात आनंद निर्माण केला की,

त्याचं ओझं वाटत नाही.



जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते

आणि

ते कोठे जमिनीवर नाही तर

आपल्या मनात रुजवावे लागते.



गुणांचं कौतुक उशीरा होतं;

पण होतं जरूर...



या जगात

कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही,

तुमचं दु:ख सुद्धा.



स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे...

जो राजवाड्यात जेवढी चव देतो,

तेवढीच चव झोपडीत पण देतो.



सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.



बचत म्हणजे काय

आणि ती कशी करावी

हे मधमाश्यांकडून शिकावं.



कपडे नाही

माणसाचे विचार Branded असले पाहिजे.



प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.



उठा, जागे व्हा

आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.



हक्क आणि कर्तव्य

या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.



केवळ ज्ञान असून उपयोग नाही,

ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.



टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.



हसा, खेळा पण शिस्त पाळा.



माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.



ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते

ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.



जग भित्र्याला घाबरवते

आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.



आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे.



पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.





Best Marathi Quotes and Suvichar



शांततेच्या काळात जास्त घाम गाळला

तर

युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.



तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.



नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,

तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.



जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात

तेंव्हा समजून घ्यावं की,

तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.



खोटी टीका करू नका,

नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.



जितका मोठा संघर्ष असतो,

तितकेच मोठे यश मिळत असते.



वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे

हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.



क्रोध माणसाला पशू बनवतो.



जिथे तुमची हिम्मत संपते,

तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते.



कडू घोट प्रेमळ

माणसाच्या हातून दिल्यास

तो कमी कडू लागतो.



तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.



परीक्षा म्हणजे

स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी.



जिंकायची मजा तेव्हाच असते,

जेव्हा

अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात.



जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.



आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो

ही जाणीव फार भयप्रद आहे.



जो धोका पत्करण्यास कचरतो,

तो लढाई काय जिंकणार.



संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात.



दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.



अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा...



केवड्याला फळ येत नाही

पण त्याच्या सुगंधाने

तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.



या जगात सर्वात सोपी

आणि

निरुपयोगी गोष्ट म्हणजे विनाकारण चिंता करणे.



क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.



दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.



घाबरटाला सारेच अशक्य असते.



शहाणा माणूस चुका विसरतो,

पण त्याची कारणे नाही विसरत.



ध्येयप्राप्तीसाठी अशी लढाई लढा,

कि

तुम्ही हरला तरी

जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.



विज्ञानाचं तंत्र शिका पण,

जगण्याचा मंत्र हरवू नका.



गरूडाइतके उडता येत नाही

म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.



केवळ योगायोग असे काहीही नाही.

जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.



भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो,

रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.





Anmol Suvichar in Marathi


आवड असली की सवड आपोआप मिळते.



कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.

शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.



चिंतेऐवढे शरीराचे शोषण

दुसरे कोणीही करू शकत नाही.



यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग

अजून तयार व्हायचा आहे.



एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं,

की भावनांना विसरायचंच असतं.



ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,

तो कधीही एकटा नसतो.



न हरता, न थकता न थांबता

प्रयत्न करणाऱ्यांसमोर

कधी कधी नशीब सुध्दा हरत.



सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चांगले.



खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे

अपूर्ण राहतात तो म्हणजे,

लोक काय म्हणतील?



विचार असे मांडा कि,

तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.



अपमानाच्या पायऱ्यावरुनच

ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.



जोपर्यंत आपण एखाद्या कामाला सुरुवात करत नाही,

तोपर्यंत ती गोष्ट अशक्य वाटते.



मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,

ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.





Marathi Motivational Suvichar



नेहमीच तत्पर रहा,

बेसावध आयुष्य जगू नका.



आपल्याला मदत करणाऱ्या

माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहावे.



जो काळानुसार बदलतो,

तोच नेहमी प्रगती करतो.



काळानुसार बदला,

नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.



चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.



निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका,

कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.



माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही,

पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.



तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.



ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.



परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतळी बनू नका,

कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.



आपले ध्येय उच्च ठेवा

आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.



यश तुमच्याकडे येणार नाही,

त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल.



तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.



जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो,

परंतु मनातुन हरणारी व्यक्ती

कधीही जिंकू शकत नाही.



लोकांना सुंदर विचार नाही,

तर सुंदर चेहरे आवडतात..!!!



मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;

ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल

सांगता येत नाही.



अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे

स्वतःवरचा विश्वास...

जो मंद हास्य करत तुमच्या कानात

प्रेमाने सांगत असतो

सगळं व्यवस्थित होईल.



राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.



भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,

भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती

आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून

दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !



भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,

रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.





Marathi Motivational Quotes with Images



पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,

ते पाप आहे असे माहीत असूनही,

आपण त्याला कवटाळतो.



जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.



कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,

लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो,

हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो,

शेकडो माणसे आयुष्यात भेटतात

पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.



खिडकी म्हणजे आकाश नसतं.



भाकरी आपल्याला जगवते

आणि

गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.



या जगात माणसाची नाही

त्याच्या पैशांची किंमत असते…



संभ्रमाच्या वेळी

नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.



आपली नरकात जायची सुद्धा तयारी असली पाहिजे,

फक्त

त्याला कारण मात्र स्वर्गीय असले पाहिजे.



क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो

आणि

क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.



मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे.



विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,

ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.



संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,

पण संकटाचा सामना करणं,

त्याच्या हातात असतं.



अन्याय करणे हे पाप आणि

होणारा अन्याय सहन करणे,

किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !



कासवाच्या गतीने का होईना,

पण रोज थोडी थोडी प्रगती करा,

खूप ससे येतील आडवे,

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.



प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते.





मराठी सुविचार


नेहमीच लहान बनून राहा

प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,

आणि इतके मोठे व्हा की

जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल.



विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही

केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.


टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ,

स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.



थोडे दुःख सहन करुन,

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,

आपण थोडे दुःख सहन करायला

काय हरकत आहे.





Suvichar in Marathi



अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे,

म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.



मनाला उचित विचारांची सवय लागली कि

उचित कृती आपोआप घडते.



तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,

किंबहुना त्याच्या कित्येकपटीने अधिक

देव तुम्हाला देईल.



या जगात तुम्ही ज्याच्यावर

सर्वात जास्त प्रेम कराल

तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त

रडवेल…



स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;

आणि

स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.



लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.



अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.



आज आराम करून

आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा,

शैक्षणिक जीवनात कष्ट करून

आयुष्यभर आरामात जगणं

कधीही चांगलं...



आवश्यकतेपेक्षा जास्त

आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे.



जगातील सर्वात सुदंर जोडी

तुम्हाला माहिती आहे का?

अश्रू आणि हास्य...!

कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही,

पण ते जेव्हा दिसतात,

तो आयुष्यातला अत्यंत सूंदर क्षण असतो.



प्रसिध्दी ही अशी बाब आहे,

जी कितीही मिळाली तरी,

माणसाची तहान भागत नाही.



खूप मोठा अडथळा आला की समजावं

आपण विजयाच्या जवळ आलो.



आपली खरी स्वप्न तीच आहेत,

जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास

आणि

सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.



जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.

चुकाल तेव्हा माफी मागा,

अन कुणी चुकलं तर माफ करा.



आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली

यावरुन तुमची खरी श्रीमंती कळते.



आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर

आणि

माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.



आयुष्यात कधीही कोणासमोर

स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका.

कारण ज्यांना तुम्ही आवडता,

त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,

अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,

ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच

विश्वास ठेवायला तयार होत नाही.



तुम्ही वाघासारखे बना

म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.



आयुष्य पूर्ण शून्य झाल

तरी हार मानू नका

कारण त्या शून्या समोर किती

आकडे लिहायचे

ती ताकद तुमच्या हातात आहे.



जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही

तर स्वतःला घडवण्यात आहे.



कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर

स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.

स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी

स्वतः उन्हात उभे रहावे लागते.



समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.



अहंकारात सर्वात वाईट गोष्ट

हि आहे कि, अहंकार तुम्हाला

हे कधीच जाणवू देत नाही कि

तुम्ही चुकीचे आहात…



प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी

आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी

एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.



मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.



जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल.



चुका, अपयश आणि नकार

हा प्रगतीचा भाग असतो.



माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं.



उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.



आपल्या प्रतिमेची काळजी घ्या,

कारण तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.



माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.



या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,

तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम

आणि तुमच्याजवळ सर्वकाही

असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.



चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,

पण त्यातून यशाच्या दिशेने

जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.



भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो

पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.



मन ओळखणाऱ्यांपेक्षा

मन जपणारी माणस हवीत कारण,

ओळख ही क्षणभरासाठी असते

तर जपवणूक आयुष्यभरासाठी.



सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,

जी एकदाच खर्च करून

त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,

पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,

ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,

परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.



प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,

जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही

प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,

तर तुम्ही चांगले आहात म्हणून.



एखाद्याला गुन्हेगार ठरविताना

त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.



प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.



चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.



ज्यांना स्वप्न पाहायची असतात

त्यांना रात्र मोठी हवी असते

ज्यांना स्वप्न साकार करायची असतात

त्यांना दिवस मोठा हवा असतो.



चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.



जगा मधील सर्वात महागडे

Gift म्हणजे वेळ...

कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला

तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात

येणारी नसते.



अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.



मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.





Changle Vichar Marathi


एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा

हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा

हेही समजायला हवे.



कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही

हे जरी खरे असले तरी कोण

कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.



आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते

पण

वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.



धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.



विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.



जर माणसाला गलिच्छ आणि

घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते

तर गलिच्छ आणि घाणेरड्या

विचारांची लाज का वाटू नये ?



आपल्या नियतीचे मालक बना

पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.



मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.



क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर

पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.



कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,

कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.



यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते

आणि

अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते!



तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.



तुमचा आजचा संघर्ष

तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो

त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.



प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.



माणसानं राजहंसासारखं असावं.

आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,

नाही ते सोडून द्यावं.



चमच्यांपासून कायम सावध रहा!



लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.



दुःख त्याच व्यक्तीला भेटते

जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून

निभावत असते…



माफी मागून लहान व्हा,

पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नका!



जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर

नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले

तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.



यश प्राप्त करण्यासाठी,

यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि

अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा

जास्त प्रबळ असली पाहिजे.



चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.



जीवनात त्रास त्यांनाच होतो

जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि

जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही

एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.



पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.



काही लोक हे

आगीसारखे असतात…

विनाकारण जळत राहतात.



रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !



यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,

पण समाधान हे महाकाठीन,

कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.



मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा

दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.



सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.



यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग

अजून तयार व्हायचा आहे.



आपल्या दोषांवरचे उपाय

नेहमी आपल्याकडेच असतात;

फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.



डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,

भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.



आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.



सुरुवात कशी झाली यावर

बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.



कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;

ते मिळवावे लागतात.



अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा,

जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील

3 गोष्टी ओळखेल.

हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम

आणि शांत रहाण्यामागील कारण.



माणूस कितीही महत्वाकांक्षी

असला तरी

त्याला परिस्थिति समोर

झुकाव लागत.



अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.



माझ्या खिशाला

होल काय पडला

पैशा पेक्षा जास्त तर

नाती गळून पडली…



प्रयत्न करून चुकलात

तरी चालेल पण

प्रयत्न करण्यास

चुकू नये…



जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.



भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;

त्याची खपली काढू नये.



मन मोकळे असणे कधीही चांगले.

परंतू जीभ कधी मोकळी सोडू नका.



अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही

आणि

विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.



बोलावे की बोलू नये,

असा संभ्रम निर्माण झाला असता

मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.



शाळेत मैत्री करा पण मैत्रीत

शाळा करू नका.



शत्रूने केलेले कौतुक

हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.



आपला एक RULE आहे

जिथे माझं चुकत नाही

तिथे मी झुकत नाही.



प्रत्येकाच्या मनात एक

आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.



माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,

भरतीचा माज नाही

अन ओहोटीची लाज नाही!



Sundar Vichar Marathi


स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,

सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो.



तिरस्कार पापाचा करा;

पापी माणसाचा नको.



सौंदर्य हे वस्तूत नसते;

पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.



तुमच्या उपस्थितीची जाणीव

आणि अनुपस्थितीची उणीव

भासणे म्हणजे तुमचे अस्तित्व होय.



विद्या विनयेन शोभते ॥



चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच

असेल असं होत नाही, त्यासाठी मन

सुंदर असावं लागतं.



आपल्यासाठी कुणीही नसले तरी

आपण सर्वांसाठी आहोत,

ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.



जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.



स्वतःची चूक स्वतःला

कळली की बरेच प्रश्न सुटतात.



कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.



आयुष्यात प्रेम करा ;

पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.



चुकतो तो माणूस

आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !



तुम्ही कोण आहात

यापेक्षा तुमचं ध्येय काय आहे

महत्वाचं आहे.



उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा….?

कधी कधी वाईट विचारांचा ही करावा…



जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.



मित्र परिसासारखे असावेत

म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.



कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे

धावलात तर हक्क दुर पळतात.



फ़ळाची अपेक्षा करुन

सत्कर्म कधीच करु नये.



आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.



मैत्री अशी करा जी

दिसली नाही तरी चालेल

पण जाणवली पाहीजे..



कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.



मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !



उशीरा दिलेला न्याय हा

न दिलेल्या न्यायासारखा असतो.



हाव सोडली की मोह संपतो

आणि मोह संपाला की दुःख संपते.



कुणाला आपलंस करायच असेल तर

वरवरुन करण्या पेक्षा

हृदयाने आपलंस करावं….

आणि

कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर

हृदया पासुन रागवण्या पेक्षा

वरवरुन रागवत राहावं.



योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ

नेहमीच योग्य असते.



तुमच्या ध्येयावरून

जग तुम्हाला ओळखत

असत.



“मी”पणा आला कि

कमीपणा घ्यायला कोणी

तयार होत नाही.



आपण कसे दिसतो यापेक्षा

कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.



जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.



 ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार

असतात

ते कधीही एकटे नसतात..



मी झुकतो कारण मला नाती

निभवायला आवडतात…

नायतर चुकीचा मी

कालही नव्हतो आणि आजही नाहीये…



जोड़ीदार सुंदर नाही,

काळजी करणारा पाहिजे…



 कष्ट ही एक अशी चावी आहे

जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे

सुध्दा दरवाजे उघडते.



शरीराला आकार देणारा

कुंभार म्हणजे व्यायाम.



कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.

आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.



गरीबी आणि श्रीमंती यावर

अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…

तर यावर अवलंबून असते की

तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही

किती समाधानी आहात…



न मागता देतो तोच खरा दानी.



प्रेम सर्वांवर करा पण

श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.



कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,

तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.



गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !



यश मिळवण्यासाठी

सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.



स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !



कितीही मोठा पाठिंबा असला

तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या

रक्तातच जिंकण्याची हिंमत

आणि लढण्याची धमक असते..



जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही,

तो जगावर काय प्रेम करणार !



आधी विचार करा;

मग कृती करा.



अपयशाने खचू नका;

अधिक जिद्दी व्हा.



क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.



आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल

असे कधीही वागू नका.



निघून गेलेला क्षण

कधीच परत आणता येत नाही.



हे वाचा : दुकानदार ग्राहक भन्नाट मराठी जोक्स | Dukandar Grahak Jokes in Marathi


100 Suvichar in Marathi


जशी दृष्टी तशी सृष्टी.



उद्याचं काम आज करा

आणि आजचं काम आत्ताच करा.



प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.



वेळ बदलायला, वेळ लागत नाही…



स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.



नवं काहीतरी शिकण्यासाठी

मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.



माणसाची खरी ओळख

त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.



सत्याने मिळतं तेच टिकतं.



कृतीपेक्षा वृत्ती महत्त्वाची असते.



प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.



हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.



मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,

तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.



कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल

आणि

प्राणाशिवाय शरीर !



प्रश्न फक्त संस्कार आणि आदर या

दोन गोष्टींचा आहे नायतर जो माणूस

ऐकून घेऊ शकतो तो चार गोष्टी

ऐकवू पण शकतो…



टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.



तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.



फ़ळाची अपेक्षा करुन

सत्कर्म कधीच करु नये.



जो गुरुला वंदन करतो;

त्याला आभाळाची उंची लाभते.



यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.



क्षमा चूक करणाऱ्याला दिली जाते…

धोका देणाऱ्याला नाही…



गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.



क्रांती हळूहळू घडते;

एका क्षणात नाही.



हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,

अहिंसा हे सबलांचे.



कर्तव्याची दोरी नसली की,

मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.



जगी सर्व सुखी असा कोन आहे;

विचारी मना तुच शोधूनी पाहे.



स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.



मनाची श्रीमंती ही कुठल्याही

श्रीमंतीपेक्षा मोठी असते.



पिंजऱ्यात कोंडून पाखरं

कधीच आपली होत नाहीत.



आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.



जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.



शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.



जगण्यात मौज आहेच पण

त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.



ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !



जो स्वतःला ओळखत नाही,

तो नष्ट होतो.



फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास

आणि

स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !



अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.



आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी

क्रोधाचे गुलाम बनू नका.



अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.



जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.



दु:ख कवटाळत बसू नका;

ते विसरा आणि सदैव हसत रहा.



व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका;

आहे तो परिणाम स्वीकारा.



स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.



संयम म्हणजे काय?

एक युद्ध….. स्वतः विरूद्ध !



एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो

म्हणून

नेहमी नवे विचार मिळवत रहा.


🌹 Marathi Best suvichar 🌹


केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.



डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर

असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.



तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा

कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.



माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.



व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.



विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.



मराठी सुविचार संग्रह


लोक वाईट नसतात…

फक्त ती तुम्हाला हवं तसं

वागत नसतात म्हणून

तुम्हाला वाईट वाटतात…



काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.



आयुष्यात प्रेम करा ;

पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.



सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;

काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.



काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही

कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.



तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.



अत्तर सुगंधी व्हायला

फुले सुगंधी असावी लागतात.



दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;

वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.



सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो

जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय ?

हे विचारणार सुद्धा कोणी नसत…



शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही;

तो स्वतःहून शिकतो.



चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.



चुकीचा व्यवहार माणसं तोडतो

म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.



जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत

नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा

तुमच्या कामाची पद्धत बदला,

कारण झाडे नेहमी आपली पान

बदलतात मूळ नाही…



आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत

सुखी राहण्याचा प्रयत्न करा,

दुःखी राहिल्याने

उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट

आजचे सुख सुद्धा निघून जाईल.



केवळ योगायोग असे काहीही नाही.

जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.



एकदा तुटलेलं पान झाडाला

परत कधीच जोडता येत नाही.



तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य

तलवार असेतोवरच टिकतं.



जगू शकलात तर चंदनासारखे जगा;

स्वत: झीजा

आणि

इतरांना गंध द्या.



काही गोष्टी मिळवायला

वेळ लागतोच.

संयम बाळगा…



आयुष्य जगून समजते;

केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही.



गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.



जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.



सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.



जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा

ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.



प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.



खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.



खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.

आपण कानांनी ऐकतो ते खोटं

आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.



तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !



सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा

व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.



केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.



अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.



सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान

श्रेष्ठ दर्जाचे असते.



जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,

समुद्र गाठायचा असेल,

तर खाचखळगे पार करावेच लागतील.



झाडासारखे जगा, खूप उंच व्हा

पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.



त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.



संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.



ऐकावे जनाचे करावे मनाचे.



दोष लपवला की तो मोठा होतो

आणि

कबूल केला की नाहीसा होतो.



कोणतही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थाबा.

त्याच्या परिप्णामाबद्दल विचार करा.

त्या नंतर सुरुवात करा.



सुविचार ही

माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.



केवळ ज्ञान असून उपयोग नाही,

ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.



चिंता ही कुठल्याच दुःखावरचा

उपाय होऊ शकत नाही.



तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली

यावरुन तुमची श्रीमंती कळते.



पाप ही अशी गोष्ट आहे

जी लपवली की वाढत जाते.



जेंव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते,

नवीन काहीतरी सुरु होण्याची..!



आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.



जीभ जिंकणारा जग जिंकतो.



तुलना करावी पण अवहेलना करू नये.



समाधानी राहण्यातच

आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.



आवडतं तेच करू नका;

जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.




​​


No comments:

Post a Comment