Friday 7 September 2018

भजन



#भजन

भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द, अर्थ, विचार, संगीत - स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय. कारण भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते. भजन म्हणजे परमेेशराचे नामस्मरण, भक्ती. नवविधाभक्तीतील कीर्तनभक्ती, भज  म्हणजे संगीत, नादब्रह्माशी एकरूपत्व, सप्तसुरांची आळवणी, परमेेशराच्या दिव्यशक्तीचे गुणगान, दिव्यशक्तीचे चिंतन, एकाग्रता. भजन म्हणजे आत्मोन्नती, होकारात्मक विचार, मनाचे आरोग्य, शारीरिक व्याधी विसरणे, बुद्धिचा विकास करणे, माणूस आपले दु:ख विसरतो.

नादब्रह्मामुळे भजन गाणारा साधक परमेेशराच्या नावाचे शब्द, त्याचा अर्थ आणि ते उच्चारण्यासाठी आवश्यक  असलेल्या स्वरांशी एकरूप होतो. त्यांचा (एकरूपत्वाचा) आनंद अनुभवून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक असे त्रास विसरून व्याधी निर्मूलन करण्यासाठी मनाची सकारात्मक अवस्था. भजन म्हणजे परमेेशराच्या शक्तीची अनेक रूपे आहेत. प्रत्येक रूपाचे नाव वेगळे अशा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेल्या परमशक्तीचे नाव घेत बसले तर मनात कसलेही वाईट विचार येत नाहीत. जसे संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग यातच गुंग असत. असे मन जर एकाच ठिकाणी स्थिर झाले तर मनाची शक्ती वाढते. परमेेशराचे गुणवर्णन आळवून केले जाते. त्यावेळी त्या भगवंताचे रूप आपल्या नजरेसमोर जसेच्या तसे उभे राहते आणि त्यातच आपले मन रमते. मनावर त्याच गुणांचे संस्कार होतात.

नैराश्य, नकारात्मक विचार, आचार यांना स्थानच राहात नाही आणि परमेेशराच्या रूपातील निर्मळ आनंदाने मन भरून जाते. भजन म्हणजे भक्तीचा सर्वात सोपा प्रकार. सतत म्हटलेल्या भजनातून मनामध्ये भक्तीचाच आविष्कार होतो आणि साधक परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. जसे मनात वाईट गोष्टींचा विचार केला तर मनावर वाईट संस्कार होतात. त्यामुळे माणसाच्या हातून कृतीपण वाईट होते. तसे भजनाने माणूस सतत परमेश्वराशी एकरूप होऊन राहातो. त्यामुळे त्याच्या हातून कर्मही चांगले घडते. चांगल्या विचारांमुळे आपल्या हातून आचारही चांगलेच घडतात. त्यामुळे भजनाला मनोरंजनाचे साधन समजू नये...
राम कृष्ण हरी