पुरुष पन्नाशीच्या निमित्ताने
तारुण्य व प्रौढावस्था यांच्या मधील काळ म्हणजे पन्नाशी . पन्नाशी गाठली म्हणजे प्रौढावस्थेत पदार्पण केल्याचं समजावं म्हणून बहुतेक हा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा असावी .
स्त्रियांना स्वतःचा नसला तरी नवऱ्याचा हा वाढदिवस साजरा करण्याची भारी हौस असते कारण सगळ्यांना नवऱ्याचं वय जाहीर होतं आणि आपोआपच त्यांच्यासाठी "सुरक्षित झोन " निर्माण होतो . त्यांच्या वाढदिवशी मात्र कितवा हे कोणाला सांगू नका बरं का असा दम भरला जातो .
वाढदिवशी नवऱ्याचं जाम कौतुक करणाऱ्या स्त्रिया दुसऱ्याच दिवसापासून कोणत्याही वेळी आणि प्रसंगी "आता पन्नाशी उलटून गेली आहे , जरा जबाबदारीने वागायला शिका "असा उद्धार करून त्याचा तेजोभंग करू पाहतात पण एवढ्याने खचेल होईल तर तो पुरुष कसला .
पोट आणि डोईवरचे छप्पर यांची केस हाताबाहेर गेली नसेल तर रंगेबिरंगी टी शर्ट , गॉगल , सौंदर्य प्रसाधने वापरून जास्तीत जास्त तरुण दिसण्याचा प्रयत्नही बरेच जण करतात .
" सर वाटत नाही हो वय , जास्तीत जास्त पस्तिशीचे वाटता " असा शेरा जर कार्यालयातल्या कोण्या सुबक ठेंगणीने मारला तर 'आज कल पाव जमी पर नही पडते मेरे ' अशी अवस्था होऊन जाते .
अर्थातच ही अवस्था घरी येईपर्यंतच टिकते कारण नवऱ्याचा आनंद आणि त्या मागचं कारण ओळखण्याएवढ्या बायका चतुर असतात आणि मग " जरा तेवढी बॅग काढून घ्या हो कपाटावरची " असं म्हणतांना " सांभाळून , आता पन्नाशी उलटून गेली आहे ; पडाल आणि हाड वगैरे मोडलं तर लवकर जुळणार नाही या वयात " असं म्हणून आभाळातून दाणकन त्याला जमिनीवर आपटून त्याचा पार कपाळमोक्ष करून टाकतात .
त्यात भर म्हणून "आता नियमित तपासणी करून घेत जा नाहीतर थेट भरती करावं लागेल एखादया दिवशी " असं बोलून त्याचे पंख पूर्णपणे छाटता नाही आले तरी तो फारसा उडू शकणार नाही याची दक्षताही काही चतुर ललना घेतात .
सासुरवाडीचं कोणी घरी भेटायला आले की ते स्वतः डॉक्टर असो वा नसो ते पण पन्नाशी नंतर होणारे आजार आणि त्या साठी घ्यायची खबरदारी यावरची माहिती इतक्या आस्थेने देतात की आपल्याला त्यातले बरेच रोग झाले असावेत असं त्यांची लक्षणं ऐकून वाटायला लागतं .
ते भेटून गेले की " बघा माझ्या माहेरच्यांना किती काळजी आहे तुमची , मुद्दाम भेटायला आले , आता जरा ऐका त्यांचं " असं म्हणून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आहारात होणाऱ्या बदलावर एक प्रदीर्घ व्याख्यान देऊन समारोप केला जातो .
डाएट वरची निरनिराळी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत तसेच इंटरनेट वरही या विषयावर खूप माहिती उपलब्ध आहे आणि ती कमी वाटली तर आपल्याकडे न मागता सल्ले देणारे रिकामटेकडे काही कमी नाहीत . तसले पदार्थ रोज खाण्यापेक्षा एकदाच काय व्हायचं ते होउदे असं नाही वाटलं तरंच नवल .
सर्वतोपरी काळजी घेऊनही मधुमेह , थायरॉईड वगैरेची लागण झालीच तर भेटायला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या ओळखीत असलेलं कोणी ना कोणी तरी कसं या आजारात अचानक गेलं याचं भीषण वर्णन करून प्राण कंठाशी कसे येतील याची पुरेपूर काळजी घेते आणि तसं झालं की " पण आता बरीच औषधं उपलब्ध आहेत " असं त्रोटक बोलून जरा दिलासा द्यायचा प्रयत्न करते .
पुरुष नेमका म्हातारा कधी होतो हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या हितचितकांना विचारणा केली त्यातल्या एकाने दिलेलं उत्तर मला अगदी मनोमन पटलं तो म्हणाला की " बायकोने संशय घ्यायचं बंद केलं की समजावं आपण म्हातारे झालो " . पण ते जाणून घेण्यासाठी काय करायला हवं याचं उत्तर मात्र त्याने टाळलं ; बघा कोणाकडे असेल तर .

No comments:
Post a Comment