Wednesday 25 July 2012

vima


विमा
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात खूपच अनिश्चितता आली आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. खचाखच रहदारी असलेल्या रस्त्यावरून जाताना सर्व थरातली माणसे जीव मुठीत घेऊन जातात. मग ती पायी चालणारी माणसे असोत, सायकल-स्कूटर-मोटर सायकल वरची माणसे असोत, की कार मधील माणसे, आदल्या दिवशीपर्यन्त निरोगी जीवन जगणारा तरूण माणूस अपघातात दगावल्याची बातमी येते आणि कुटुंबात शोककळा पसरते.
लोकांना खरं तर चालायला आवडते, परंतु आजकाल रस्त्याच्या कडेने चालणे सुद्धा तितकेसे सोपे नसते. भारतातल्या कुटुंब पद्धतीत ब-याचदा एका माणसाच्या उत्पन्नावर घर चालत असते. आणि असा कमावता माणूस जर अपघातात गेला तर कुटुंब एकटे पडते. आणि न कमावणारा माणूस दगावला तरीही भावनेत गुंतलेले कुटुंब तुटते. मानसिक वेदनेतून जाते.
ह्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा विमा उतरवणे ही खूप महत्त्वाची बाब ठरली आहे.

No comments:

Post a Comment