Sunday 2 September 2012

पेण,जोहे, हमरापूरच्या मूर्तींना वाढती मागणी

मुंबईमध्ये मिळणार्‍या गणेशमूर्तींपैकी ६५ ते ७0 टक्के गणेशमूर्ती या पेण, हमरापूर,जोहे,दादर,कळवा आणि पेणच्या आजूबाजूच्या गावांमधून आणलेल्या असतात. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईमध्ये मूर्ती तयार करून मूर्ती विकणारे मूर्तिकार सुमारे ३५ ते ४0 इतकेच आहेत. दिवसेंदिवस मागणी वाढल्याने गणेशमूर्ती विकत आणून त्यांना सजवून मूर्ती विकणार्‍यांच्या संख्येत मुंबईमध्ये वाढ झाली आहे.

आता पेणच्या बरोबरीनेच हमरापूर,जोहे,दादर,कळवा हेदेखील गणेशमूर्ती व्यवसायासाठी प्रसिद्ध होत आहे. इथे तयार केलेल्या मूर्ती थेट मुंबईमध्ये विक्रीसाठी आणल्या जातात. हमरापूरहून न रंगवलेल्या गणेशमूर्ती आणि रंगवलेल्या गणेशमूर्ती अशा दोन प्रकारच्या गणेशमूर्ती मुंबईमध्ये आणल्या जातात. तिथून आणलेल्या मूर्ती या मुंबईमध्ये जवळपास दुप्पट किमतीने विकल्या जातात.

न रंगवलेल्या गणेशमूर्ती गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिने आधी मुंबईमध्ये आणल्या जातात. या मूर्तींचे मुंबईमध्ये रंगकाम आणि सजावट केली जाते. त्याचप्रमाणे रंगवलेल्या पेणच्या मूर्ती आणल्या तरी त्यांच्या दागिन्यांना खडे लावणे व इतर सजावट करण्यात येते. अशा प्रकारे या मूर्तींवर काम करून मुंबईमध्ये विकल्या जातात. शहरामध्ये ठिकठिकाणी गणेशोत्सव जवळ आला की, दुकानांचे गाळे किंवा रस्त्यावर मंडप टाकून तिथे गणेशमूर्ती विकणारे विक्रेते दिसतात. हे बहुतांश विक्रेते हे अशाच प्रकारे गणेशमूर्तींचा व्यवसाय करतात.

मुंबईमध्ये गणेशमूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईतले मूर्तिकार ही मागणी पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणून या प्रकारच्या व्यवसायामध्ये वाढ झाली आहे,

मुंबईमध्ये पेण, हमरापूर,जोहे,दादर,कळवा.  गावांमधून  मूर्ती आणून विकण्याचा व्यवसाय वाढीला लागला आहे.  मूर्तिकारांना जागेचा प्रश्न असतो, आर्थिक प्रश्न असतात. पण रेडीमेड मूर्ती विकत आणून विकण्याचा व्यवसाय करणार्‍यांना आर्थिक प्रश्न नसतो. मूर्तिकारांच्या कलानिर्मितीला हे एक आवाहन आहे, 

पेण, हमरापूर,जोहे,दादर,कळवा. येथील मूर्तिकारांना जास्त नफा मिळत नाही. मुंबईला मूर्ती नेण्याचा आणि सजवण्याचा खर्च हा जास्त असतो. म्हणून तिथे मूर्तींच्या किमतीमध्ये वाढ होते. इथून लाखो मूर्ती मुंबईला जातात, असे पेण,जोहे,हमरापूर. येथील मूर्तिकाराने सांगितले.

No comments:

Post a Comment