पेण- तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणा-या दादर गावातील यंदा होणारी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवले आहे. त्यासाठी गावपातळीवरील विविध राजकीय पक्ष, संघटनांतील महिला, तरुण आणि ज्येष्ठांचा वर्ग एक झाला आहे. या सर्वानी मिळून दादर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासंबंधी एकमुखी ठरावच केला आहे.
1954 मध्ये स्थापन झालेली दादर ग्रामपंचायत ही अगदी सुरुवातीपासून भांडणतंटय़ाची पंचायत म्हणून ओळखली जाते. निवडणूक काळात येथे होणारी भांडणे नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. यंदाची निवडणूक तंटामुक्त होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्ते सरसावले आहेत.
त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नुकतेच येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे सांगतानाच दादर गावच्या इतिहासात नवीन भर पडावी, जेणेकरून गावचा विकास होईल,
No comments:
Post a Comment