Saturday 6 April 2013

फेसबुक म्हणजे नेमके काय आहे?

Facebook ही एक सोशल नेटवर्किंगची सुविधा देणारी website (संकेतस्थळ) आहे. मित्रमैत्रिणींशी अथवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये संपर्कात राहण्यासाठी समूह  करण्याच्या दृष्टीने बनविलेली हे website आहे. 13 वर्षावरील कुणीही या वेबसाइटवर आपले मोफत खाते उघडू शकतो. या करिता फक्त आपला चालू ई-मेल त्यांना कळविणे आवश्यक आहे. एकदा का आपण Facebook वर आपले खाते उघडले की मग या खात्याद्वारे आपण Facebook वरील इतर खात्यांबद्दल माहिती शोधू शकता. जसे आपण आपल्या खात्यामधून आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीचे Facebook मधिल खाते पाहू शकता. साहजिकच या करीत त्या आपल्या मित्रमैत्रिणीचे Facebook वर खाते असणे आवश्यक आहे.

ज्या प्रमाणे दुसर्‍याला फोन करताना आपल्याकडे तसेच त्या दुसऱ्याकडे फोन असणे आवश्यक आहे, तसेच त्याचा फोन क्रमांक आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तसेच Facebookवर इतरांचा शोध घेताना त्यांचे देखिल Facebook वर खाते असणे आवश्यक आहे.

आपण आपल्या Facebook च्या खात्यामधून दुसर्‍याचे Facebook खाते शोधल्यानंतर त्यामध्ये त्यासाठी आपण आपला संदेश ठेवू शकतो, आपण आपले फोटो देखिल एकमेकांना दाखवू शकता. तसेच आपण इथे आपण एखाद्या समारंभ अथवा कार्यकमाची माहिती इतरांना कळवू शकता.

Facebook वर आपण आपल्याला हव्या असल्याप्रमाणे आपले समूह तयार करू शकतो. समूहाचा फायदा असा की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादा संदेश अनेकांना पाठवायचा असल्यास आपण जर तसा समूह तयार केला असल्यास फक्त त्या समूहाला संदेश पाठविल्यास तो आपोआप त्या समूहातील सर्वांना मिळतो. आपल्या मित्रमैत्रिणींचा समूह तयार करण्यासाठी आपण त्यांना Facebook वर शोधू देखिल शकतो तसेच जर त्यांचे Facebook वर खाते नसेल तर त्यांना Facebook वर खाते उघडण्यासाठीचा ई-मेल पाठवून त्यांना आमंत्रण देखिल करू शकतो.

मोबाईलमधील एसएमएस प्रमाणेच त्वरित संदेश आदानप्रदान करण्यासाठी Facebook एक चांगली website आहे.

No comments:

Post a Comment