Friday 27 January 2023

मराठी कलाकारांचे टोपण नावे तुम्हाला माहित आहेत का.

आपल्या सर्वांना एक टोपन नाव असते. हे टोपण नाव आपल्याला लहानपणी घरच्यांनी दिलेले असते किंवा शाळेत गेल्यावर मित्र मैत्रिणीने दिलेले असते.


प्रसाद ओके




अभिनेता प्रसाद ओकला मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक,गायक आणि परिक्षक म्हणून ओळखले जाते. प्रसाद सध्या सोनी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करतो. प्रसाद ओकला पश्या या टोपणनावाने ओळखले जाते.


* पर्ण  पेठे -




अभिनेत्री पर्ण पेठे ने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, पर्ण पेठेला छोटी या टोपणनावाने ओळखले जाते.



अशोक सराफ




हे मराठी चित्रपट सृष्टीतच नव्हे तर बॉलिवुडमध्येही आपल्या

अभिनयाचा डंका वाजवणारे सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. अशोक सराफ यांनी  3 दशके विनोदी शैलीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये मामा या नावाने ओखले जाते. त्यांना अशोक मामा असे खास प्रेमाने म्हटले जाते,  आणि हेच त्यांचे रोपण नाव आहे.


* नाना पाटेकर -




 मराठी नाटक, चित्रपट याबरोबरच हिन्दी चित्रपटसृष्टीत या दमदार अभिनय ठसा उमटविणार अभिनेते म्हणून नाना पाटेकर यांना ओळखले जाते. बऱ्याच लोकांना त्यांचे खरे नाव विश्वनाथ हे आहे माहित नसेल. आज ही सर्वसामान्य प्रेक्षक असो की मग मनोरंज सृष्टीतला कलाकार असो सर्वजन त्यांना नाना म्हणुन ओळखतात. आणि नाना म्हणुनच हाक मारतात


★ सुयश टिलक




 मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा सर्वांचा लाडका अभिनेता सुयश टिळक.सुयश ने मराठी मालिकेमध्ये आणि चित्रपटामध्ये त्याच्या अभिनयाला ठसा उमटवला आहे. का रे दुरावा या मालीकेतील भूमिकेसाठी तो आज ही ओळखला जातो. सुयशला सुद्धा सुट्टी आणि मम्मा या टोपण नावाने ओळखले जाते.


* तेजस्विनी पंडीत -




 तेजस्विनीने आतापर्यंत अनेक दर्जेदार मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधुन तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तेजस्विनीला मनोरंजन सृष्टीत बंड्या या टोपण नावाने ओळखले जाते.


* सिद्धार्थ जाधव -




 मराठी आणि हिन्दी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधवला पंसती दिली जाते. आपल्या हटक्या विनोदी शैलीतुन आणि फॅशन स्टाईल मधुन तो चाहत्यांचे लक्ष वेधुन घेत असतो. अशा या लाइक्या सिद्धार्थला मराठी इंडस्ट्रीत मध्ये सिद्दू म्हटले जाते. सिद्दू या टोपणनावाने हाक मारली जाते.


संस्कृती बालगुडे -




मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लैमरस अभिनेत्री अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे, संस्कृतीने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या वडीलांनी त्यांचे बिट्टा असे नाव ठेवले आहे.



हेमंत ढोमे -




अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे ने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटामधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हेमंतला तर शाळेत असल्यापासून ढोम्या या टोपणनावाने ओळखले जाते.


अंकुश चौधरी -




 मराठी चित्रपटसृष्टीत दिग्गज अभिनेता म्हणून अंकुश चौधरीला ओळखले जाते. अंकुश ने मराठी इँडस्ट्री मध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटान मधल्या त्याच्या भुमिका विशेषता गाजल्या आहेत. या आपल्या लाडक्या अभिनेत्याला अक्की या टोपणनावाने ओळखले जाते.




No comments:

Post a Comment