Saturday 28 January 2023

मकरंद अनासपुरे ची पत्नी कोन आहेत माहित आहेत काय?




मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मकरंद अनासपुरे  90च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या मकरंद यांनी आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मकरंद यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नीसुद्धा अभिनेत्री असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का?  

मकरंद अनाजपूरे एका नाटकात काम करत असताना त्याची शिल्पा ह्या अभिनेत्रीसोबत ओळख झाली. हि शिल्पा नक्की आहे तरी कोण असा अनेकांना प्रश्न पडला असेल, चला तर मग जाणून घेऊयात हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण… ह्या अभिनेत्रीच संपूर्ण नाव आहे “शिल्पा मकरंद अनासपुरे” होय ही मकरंद अनासपुरे यांची पत्नी आहे. “जाऊबाई जोरात” या नाटकात काम करत असताना दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन पुढे २००१ साली दोघांनी लग्न केल. लग्नानंतरही शिल्पाने काही चित्रपटांत पती मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटांत कामे केली. पण मकरंद अनासपुरे यांच्या इतका दांडगा अभिनय नसल्याने अभिनयात त्यांना आपला ठसा उमठवता आला नाही असेच म्हणावे लागेल. एक दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपटांत त्यांना मकरंद सोबत काम करायची संधी मिळाली. “कापूस कोंड्याची गोष्ट”, “तुक्या तुकविला नाग्या नाचविला”, “सुंबरान”, “गोष्ठ छोटी डोंगरा एवढी” अशी त्या चित्रपटांची नावे ज्यात मकरंद सोबत त्यांची पत्नी शिल्पा हि देखील पाहायला मिळाली. अभिनयात जरी शिल्पा फिक्या पडल्या असल्या तरी मकरंद आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशन च्या कार्यात शिल्पा ह्यांचा देखील खारीचा वाटा आहे.



मकरंद आणि शिल्पा अनासपुरे ह्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव “केशव अनासपुरे”असून तो नऊ वर्षाचा आहे. तर मुलगी चौदा वर्षांची आहे. शिल्पा अनासपुरे ह्या मकरंद प्रमाणेच मनमेळाऊ स्वभावाच्या आहेत. ब्रँडेड कपडे घालण्यापेक्षा आहेत ते कपडे चांगले स्वच्छ धुऊन नीटनेटकं राहणं त्यांना खूप आवडत. मकरंद अनासपुरे नेहमी सांगतात घरी कोणी पाहुणे मंडळी आली कि “अगं चहा टाक गं” असं कधीही सांगावं लागत नाही. उलट पाहुणे मंडळींनी आणलेली फळं लागतील तेवढीच ठेऊन जास्तीची फळं त्या नोकरांना देतात. आपण काय करतो कसे वागतो ह्याचा आपल्या मुलांवर परिणाम होतो आणि मुलंही आपली कृती करतात त्यामुळे मुलांना वेगळं काही सांगायची गरज भासत नाही. आईच्या (शिल्पा) ह्याच्या स्वभावातून मुलं खूप काही शिकतात आणि त्यातून मलाही खूप काही शिकता येत अशीही स्तुती मकरंद नेहमी करताना पाहायला मिळतात. मकरंद आणि शिल्पा अनासपुरे ह्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या  कडून खूप खूप शुभेच्छा….

No comments:

Post a Comment