*अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
* आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.
* आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते.
* आशा ही उत्साहाची जननी आहे.
* अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
* आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
* आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो.
* आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते !
* अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
* अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
* आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.
* आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
* असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.
* असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगूर असतो.
* इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.
* उद्योगी माणूस कधीच निर्धनम नसतो.
* कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
* कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
* कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
* कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.
* कोमलता हा ह्रदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक
मजबूत बनवा आणि ह्रदयाला फ़ुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.
* खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
* खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.
* घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.
* गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.
* घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
* घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाडमयाचे कार्य आहे.
* चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.
* छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते.
*चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी.
* जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.
* ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.
* जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?
* ज्याची कृती सुंदर तो सुंदर !
* जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
* ज्योतीचं म्हत्त्व, पावित्र्य अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळंत.
* जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
* जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख कायेतं ? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती,क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून !
* ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !
* झऱ्याचे रुपांतर नदीत होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात. वाईट सवयींचेही असेच होते.
* जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो.
* ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.
* तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
* थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
* थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
* दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
* दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.
* दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.

*) दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.
* दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.
* दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.
* ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
* नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
* नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.
* नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.
* प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
* पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो, तो आपोआप जिरू द्यावा लागतो.
* कलेची पारंबी माणसाला बळ देते.
* फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.
* बुद्धीमत्तेपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आहे.
* काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.
* मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
* मुलांच्यात बदल हाच शिक्षकाचा आनंदाचा ठेवा !
* माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.
* माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
* माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.
* मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
* नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.
* मोठ्या लोकांचा मत्सर करु नका; कारण त्यामुळे तुमचा क्षुद्रपणा प्रकट होतो.
* यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.
* रडण्याने भविष्य बदलत नसते.
* लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं.
* विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत.
* वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.
* विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.
* शिक्षेपेक्षा क्षमेनेच कार्यभाग साधता येतो.
* शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
* संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.
* संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुककी तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात.
म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही !
* जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.
* सोप्यातले सोपे कामही आळशी मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका.
* समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका.
* प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणं हेच प्रेम.
* स्वत:च स्वत:चे न्यायाधीश बनू नका.
* संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दु:ख वाटून घेण्यात फ़ार मोठा आनंद असतो.
* संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव !
* ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते.
* हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
* हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.
* आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.
* श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात
* क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.
* ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चात्रित्र्य निर्माण करणे हेच असले पाहिजे.
* आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.
* प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
* जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे.
दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे.
* दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.
* काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.
* जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.
* असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे
ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते.
* वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
* स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.
त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.
* 'स्व' चा शोध घेण्यास 'स्व' बद्दलचे सत्य मत लागते.
* तुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी तेवढीच तुमची बदनामी जास्त.
* पापी माणसाला पाप कधीही शांतपणे झोपू देत नाही
* सुधारणा ही बाहेरुन लादता येत नाही, तिचा उगम आतूनच पाहिजे. भीती घालून कुणालाही सदगुणी बनवता येत नाही.
* अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.
* गैरसमज कधीही मनात ठेवू नये. त्याचे निराकरण करावे.
* ज्याच्याजवळ पैशाशिवाय दुसरे काहीच नाही तो सर्वात गरीब!
* जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ठ होत नाही. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,
तेव्हा त्याचे काहीतरी नष्ठ होते. परंतु, जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते.
* एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे.
* कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.
* परिश्रमाशिवाय प्रारब्ध्द पांगळे असते.
* देशातीत्ल प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत स्वत:च्या कर्तव्याची जाणीव होत नाही किंवा ती जाणीव होऊनही
त्यानुसार वागावेसे वाटत नाही, तोपर्यंत त्या देशाचा उध्दार होणे कठीण असते.
* तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.
* जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.
* शहाणा मनुष्य स्वत:च्या उत्पन्नाप्रमाणेच स्वत:चे जीवन जगतो.
* प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत:च असतो.
* विश्वास म्हणजे मनुष्याला जीवंत ठेवणारी शक्ती होय.
*चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शितल असतो.
* जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका.
त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.
* विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो
आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.
* मृत्यूला सांगाव, ये ! कुठल्याही रुपाने ये. पण जगण्यासारखं काहीतरी
जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
* जगातील प्रत्येक घर हे शाळा आहे, आणि माता पिता हे शिक्षक !
* स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते.
* ज्यांना नमस्कार करायला जागा नाही अशी माणसं अभागी आणि जागा असूनही
ज्यांना नमस्कार करता येत नाही ती निव्वळ कपाळकरंटी.
* सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत. य़ेतो म्हणतात पण येत नाहीत.
* नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं
थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.
* धर्माच्या नावाने मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळणे हा अधर्म आहे.
*हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे स्वत:ची विक्री केल्यासारखे आहे.
* या जगात एकच जात आहे- माणूस ! आणि धर्मही एकच- माणूसकी!
* परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.
* कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन.
* नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली तो म्हातारा.
* खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥
* ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा.
* ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.
* आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
* पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.
* ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥
* स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !
* समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.
* या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.
* महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.
.
* माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.
* गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
* यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
* आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
* आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
* मी करतो या भावनेचे नाव प्रपंच, तर परमेश्वर माझ्याकडून करवून घेत्तो या भावनेचे नाव परमार्थ !
शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे.
३९८) स्वार्थरहीत सेवा हीच ख्ररी प्रार्थना.
* लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.
* सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात: म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते
* सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
* भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.
* परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
* माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे तर गुणांनी प्राप्त होते.
* स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
* चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.
* काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?
* अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
* यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.
* सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
* सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते.
* अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
* झाडासारखे जगा... खूप उंच व्हा... पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
* स्वर्गापेक्षाही चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करा. कारण चागंली पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होईल.
* इच्छा दांडगी असली की मदद आपणहून तुमच्याकडे चालत येते.
* अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात.
* कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.
* अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.
* तलवार ही शुरांची नव्हे; भीतीची निशाणी आहे.
* जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे, परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.
* आज्ञेला सामर्थ्य यायला आधी सेवा करावी लागते .
* माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो . अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो .
* जीभ जिंकणारा जग जिंकतो.
* झाले गेले विसरुनि जावे... पुढे पुढे चालावे... जीवनगाणे गातच राहावे.
* गुलाब पाणी देणाऱ्या हातांना त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.
* जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
* विचार कराण्यासाढी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
* कर्मण्ये वाधिकारस्ते मा फ़लेषु कदाचन ॥
* चारीत्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंतःकरणात चंद्राची शीतलता असायला हवी.
* प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.
* शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
* शक्योतोवर कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
* पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
* अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.
* देश तुमच्यासाठी काय करील हे विचारण्यापेक्षा देशासाठी तुम्ही काय कराल ते सांगा.
* अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
* समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.
* फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.
* पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.
* दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.
* श्रध्देच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य करता येतात.
*महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते.
* क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
* आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
* पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.
* जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
* अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.
* जे तलवार चलवतील ते तलवारीनेच मरतील.
* मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
* दुष्टांच्या संगतीत सदाचार लोप पावतो.
* विचार परीपक्व झाले की शब्दांचे रूप देऊन कागदावर उतरवता येतात.
* नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खूप अवघड.
* राजाला फक्त राज्य मानते, तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व.
* निंदकाचे घर असावे शेजारी.
* लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे.
* कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही; मात्र मोर मेला तर आपण हळहळतो. कारण सौंदर्य नष्ट होते.
* बुध्दी आणि भावना यांचा योग्य संयम म्हणजेच विवेक.
*त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे.
* आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवरमाणसासारखे वागायला शिकलो,का?
* मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वातंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
* प्रत्यक्षानुभूती हेच खरे ज्ञान.
* कुणाचेही अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे खरे भाषण !
* खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे आणि देशाचे हीत ज्यात असेल तेच करावे.
* जो आत्मप्रौढी करेल त्याची मानहानी होईल आणि जो नम्रतेने राहील त्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल.
* खरी प्रीती ही कुसुमापेक्षाही कोमल व वज्रापेक्षाही कठोर असते.
* कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.
* मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे, तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.
* कीर्ती ही सावलीप्रमाणे सदगुणांबरोबर वावरत असते.
* औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
* हात उगारण्यासाठी नसतात; उभारण्यासाठी असतात.
* तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून असते.
* माणसाचे चरित्र्य आरशात दिसत नसते.
* वैयक्तिक तृष्णेला अंत नसतो.
* जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.
* सन्मित्र ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे
* गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.
* गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच.
* ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.
* लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
* दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे.
* सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले.
* प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते.
* नियम अगदी थोडा असावा पण तो प्राणापलिकडे जपावा.
* शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
* सदगुणांवर हल्ला केला तरी त्याला इजा होत नाहीत.
* मानापमानाच्या पलिकडे जगणं शिका.
* माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे म्हणा.
* जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
* सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड.
* माणंसाकरिता धर्म आहे, धर्माकरिता माणसे नाहीत हे लक्षात घ्या.
* जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.
* माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशूत होते.
* कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो.
* प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
* केल्याविण सांगो नये आपला पराक्रम ॥
* विचार बदला; आयुष्य बदलेल.
* ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
* एकच नियम पाळा - कोणताही नियम तोडू नका.
* ज्याला काय लिहावं यापेक्षा काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक !
* सत (चागंले) कडे नेते ते सत्य.
* मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का !
* बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !
*) मृत्यू म्हणजे दु:ख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो
या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही.
* आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप !
* ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
* आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.
* आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
* आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
* जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
* सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
*उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
* लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
* मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
* जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
*सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
* जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
* संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
* जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
* सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, आयुष्याचे गणित आहे.
परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी
* क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
* जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
* जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
* जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
* वैभव त्यागात असते, संचयात नाही.
* तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
* खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
*मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
* पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
* ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
* टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
* प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
* मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
* भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
* वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
* त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
*शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
* कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
* बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
* दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
*ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
*दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
* जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
* एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
* सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
* श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
* राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
* संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
* असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
* उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
* ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
* जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
* पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
* मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
* दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
* आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?
* जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
* पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
* आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
* अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
* मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
* नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
* अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
* सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
* शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
* गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
* दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
* पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
* पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
* स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
* अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
* चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
* स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
* अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
*क्रोध माणसाला पशू बनवतो.
* आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
*आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
* जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
* कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
* परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
* भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
* माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
* बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
* शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
* तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
* आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
* जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
* आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
* जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
* लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
* ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
* कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
* हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
* आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
*गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
* आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
* जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
* अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
*तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
* न मागता देतो तोच खरा दानी.
*चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
* केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
* समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही
* भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
* दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
* निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.
* खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा.
* क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
* जशी दृष्टी तशी सृष्टी.
* श्रवण, भाषण, वाचन, निरीक्षण आणि लेखन एवढे दुर्मीळ अलंकार परमेश्वराने दिले असताना इतर आभूषणांची गरजच काय ?
* प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी.
*सत्तेपूढे शहाणपण चालत नाही.
* लक्ष्मी सत्पुरूषाच्या घरी त्याच्या गृहिणीच्या स्वरूपात नांदत असते.
*जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ॥
* चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका.
*निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.
*माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.
* कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.
*आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.
* सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात.
* बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.
* संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.
* हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे, अहिंसा हे सबलांचे.
*परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.
* शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही.
* कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
*प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.
* मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ !
* ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते.
* अतिपरिचयाने अवाज्ञा होते.
* विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.
* शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय.
* जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.
* न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.
* भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि
वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
* कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती !
* साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.
* जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.
* दुर्बल मनाचा मनुष्य कधीच हुतात्म होऊ शकत नाही.
* अन्न हे पूर्णब्रह्म आहे; त्याचा अनादर करू नका.
* ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते; तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा.
* संकटी जो हाक मारी, हात त्याला दे तुझा रे ! हीच आहे लोकसेवा, हेच आहे पुण्य रे !
* डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
* काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.
* प्रफ़ुल्लता हेच चेहऱ्याचे खरे सौदर्य . औदासिन्य चेहऱ्याला कुरूप बनवते .
* अंतःस्थपणे जीवन संपन्न करते तेच खरे मनोरंजन .
* शारीरिक सौदर्य़ कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौदर्य़ कधीच नष्ट होत नाही .
* ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय .
* जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या .
* तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका ; कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.
* केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
* सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.
* रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा.
* सहित्य ही उपासना आहे, वासना नाही. ती वासना झाल्यास साहित्य अवनत होते .
* समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे, एकी होय .
* कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा; भक्ती म्हणजे सेवाभाव .
* बिनभिंतीची इथली शाळी, लाखो इथले गुरु । झाडे, वेली, पशुपाखरे यांची संगत धरु ॥
* आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो .
* आरोग्य हाच सर्वोतम लाभ, तृप्ती हेच खरे धन ,विश्वसनीय मित्र हेच सर्व सर्वोत्कृष्ट नातेवाईक आणि निर्मिती हाच परमानंद आहे .
* जीवनाचे सोने होईल अशी खटपट करा .
* वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका .
* पायदळी चुरगळलेली फ़ुले चुरगळणाऱ्या पायाला आपला सुगंध अर्पण करतात . खऱ्या क्षमेचेही कार्य हेच आहे .
* आवड असली की सवड आपोआप मिळते .
* जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते .
* स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात .
* अंथरूण बघून पाय पसरावेत.
* आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फ़ुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.
* मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात हा प्राथेनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो.
* चिंतेऐवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही.
*प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.
* गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उतम !
* तासभराचे ध्यान हे वर्षभर केलेल्या पूजेअर्चेहून श्रेष्ठ आहे.
* उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते.
* एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं .
* अधर्म , अनीती , अनाचार यांच्या साहाय्याने मिळविलेला जय पराजयापेक्षाही आधिक लांच्छनास्पद आहे.
* सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
*आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
*प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
* जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
* यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
* प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
* ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
* यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
* प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
* चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
* मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
*छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
* आपण जे पेरतो तेच उगवतं.
* फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
* उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
* शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
*प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
*आधी विचार करा; मग कृती करा.
* आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
* फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
* एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
* अतिथी देवो भव ॥
* अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
* दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
* आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
* निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
* उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
* चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
* नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
*माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
* सत्याने मिळतं तेच टिकतं.
* जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
*परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
* हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
*स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
* प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
*खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
* तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
* वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
*जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
* गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
* झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
* माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
* क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
*सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
* मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
* आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
* बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
* मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
* तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
* शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
* मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
* आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
* एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
* परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
* खिडकी म्हणजे आकाश नसतं.
* जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
* वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
* भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
* कविता म्हणजे भावनांचं चित्र!
*संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
* तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
* ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
* स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
* अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
* तुलना करावी पण अवहेलना करू नये.
* समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
*आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
*मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
* चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
* व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
*आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
* तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
* अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
* विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
* मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
* आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
* आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
* प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
*तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
* सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
* काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
* लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
* चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
* तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
* भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
*चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
* आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
* उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
* पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
* अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
*मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
* रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
* अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
*अंथरूण बघून पाय पसरा.
* कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
* तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
* अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
*संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
*सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
* सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
* शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
*सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
* शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.
* जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
* एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
* कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
*आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
* ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
* कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
* देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
* आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
* मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
*ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
* जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
* आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
* रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
*जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
*लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
* कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
*जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
* पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
* आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
* गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
* कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
* स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
* ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
* जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
* सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
* श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
* आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
* एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
* प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
* आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
* आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.
*मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
* स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
* अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
* हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
* आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
* बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
* कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
* टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
* नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
* यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
*आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
* खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
* जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
* प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
* स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
* आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
* माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
* जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
* तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
* शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
* हसा, खेळा पण शिस्त पाळा.
* आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
* स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
* तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
* काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
* काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
* एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
* हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
* उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
* या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
* तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
* केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
* दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
* माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
* प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
* व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
* काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
* दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
* शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका
* जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
* दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
* शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
* जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
*परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
* ऎकावे जनाचे करावे मनाचे.
* एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
* केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
* बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
* चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
* तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
* दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
* स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
* स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
* त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
* जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या
* दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
*पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
*उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
* जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
* मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
*आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
*मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
*बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
* तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
* गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
* स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
* प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.