Monday, 27 August 2018

रक्षाबंधन




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 रक्षाबंधन. मने जुळवणारा सण भारतात आनंदमयी वातावरणात साजरा झाला . बहिण - भावाच्या नात्यातील अनुबंध अधिक घट्ट झाले .भारतीय संस्कृतीत या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे .
   स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते... लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते... मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते...
       व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही... बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही... बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात... कधीकधी बहीणही माहेरी येते... रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे...
       लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात... यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते... बहीण-भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात... लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले असतात... परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात... हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो...
       बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात... आपली बहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक भावाची मनोकामना असते... बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो... लहान परी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत.! दादाची ती लाडकी छकुलीच असते... आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते...
       दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते... मग ते लहान असोत की मोठे.! रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.
 या सणाचे महत्त्व कमी होऊ देऊ नका .
                     

Monday, 20 August 2018

गणपतीची मुर्ती कशी असावी

गणपतीची मुर्ती कशी असावी




१) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,

२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,

३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.

४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,

५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये,
कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,

६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,

७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही,
तोवर ती केवळ माती समजावी.विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,

८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये.

९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा,गणपती विसर्जनाची घाई करू नये,

१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये,

११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,

१२) कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो, ही अत्यंत विकृत प्रथा आहे, गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे, पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका, मुर्ख प्रथा बंद कराव्यात,

१३) विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ मृदंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या,
अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नका !

 आणि वरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नका 🙏

🌷 गणपती बाप्पा मोरया🌷

लालबागचा असो कि अंधेरीचा...

आपल्यासारखे बावळट भक्त भेटायला जातात म्हणून तो राजा झाला...

त्या गणपतीच्या दर्शनाने जर तिथलेच कार्यकर्ते सुधरायला तयार नाहित, तर आपण तिथे तरफडायला जायची खरंच गरज आहे का...?

जे दहा दिवस गणपती समोर असतात ते सुधरत नाहीत, तर आपण धक्के खाऊन सेकंद भरात दर्शन घेऊन सुधारणार का...?

किती अंधारात चाचपडताय तुम्ही लोक...?

घरातल्या गणपती समोर तासभर शांत बसावे.

चांगले आत्मपरिक्षण करावे...

सरळ वागावे ...

घरातलाच गणपती कृपा करील.

गणपतीच्या कंपन्या वेगवेगळ्या नसतात...

तुमच्या खोपड्या वेगवेगळ्या असतात....

नका हेलपाटून मरू....!

 पप्पी दे पप्पी दे पारुला....
आवाज वाढव DJ तुला आईची..
चिमणी उडाली भुर्रर्र...
पोरी ज़रा जपून दांडा धर...
झिंग झिंग झिंगाट...
शांताबाई शांताबाई...

अशी गाणी कधी मशीदींच्या भोंग्यांवर, ख्रिस्ती- जैन- बौद्ध- सिख - पारशी यांच्या धार्मिक स्थानांवर अथवा उत्सवांमध्ये वाजवलेली ऐकली आहेत का कधी ???

तेही सिनेमे बघतात नां ? पण स्वतःच्या धार्मिक कार्यक्रमात/मिरवणुकीत असली फालतुगिरी नाही करत ते.

बघा सुधारता येतय का ...नाहीतर मग कोर्टाने आदेश काढल्यावर बोंबाबोंब करतात की सगळे नियम हिंदूंनाच का ?

स्वतः असली फालतूगिरी करू नका व तुमच्या समोर होत असल्यास त्याचा तत्काळ विरोध करा ... धर्माभिमानी बना धर्मांध नाही...

पुरुष पन्नाशीच्या निमित्ताने

पुरुष पन्नाशीच्या निमित्ताने



     तारुण्य व प्रौढावस्था यांच्या मधील काळ म्हणजे पन्नाशी . पन्नाशी गाठली म्हणजे प्रौढावस्थेत पदार्पण केल्याचं समजावं म्हणून बहुतेक हा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा असावी .
     स्त्रियांना स्वतःचा नसला तरी नवऱ्याचा हा वाढदिवस साजरा करण्याची भारी हौस असते कारण सगळ्यांना नवऱ्याचं वय जाहीर होतं  आणि आपोआपच त्यांच्यासाठी  "सुरक्षित झोन " निर्माण होतो . त्यांच्या वाढदिवशी मात्र कितवा हे कोणाला सांगू नका बरं का असा दम भरला जातो .
        वाढदिवशी नवऱ्याचं जाम कौतुक करणाऱ्या स्त्रिया दुसऱ्याच दिवसापासून कोणत्याही वेळी आणि प्रसंगी "आता पन्नाशी उलटून गेली आहे , जरा जबाबदारीने वागायला शिका "असा उद्धार करून त्याचा तेजोभंग करू पाहतात पण एवढ्याने खचेल होईल तर तो पुरुष कसला .
        पोट आणि डोईवरचे छप्पर यांची केस हाताबाहेर गेली नसेल तर रंगेबिरंगी टी शर्ट , गॉगल , सौंदर्य प्रसाधने वापरून जास्तीत जास्त तरुण दिसण्याचा प्रयत्नही बरेच जण करतात .
        " सर वाटत नाही हो वय , जास्तीत जास्त पस्तिशीचे वाटता " असा शेरा जर कार्यालयातल्या कोण्या सुबक ठेंगणीने मारला तर 'आज कल पाव जमी पर नही पडते मेरे ' अशी अवस्था होऊन जाते .
      अर्थातच ही अवस्था घरी येईपर्यंतच टिकते कारण नवऱ्याचा आनंद आणि त्या मागचं कारण ओळखण्याएवढ्या बायका चतुर असतात आणि मग " जरा तेवढी बॅग काढून घ्या हो कपाटावरची " असं म्हणतांना " सांभाळून , आता पन्नाशी उलटून गेली आहे ; पडाल आणि हाड वगैरे मोडलं तर लवकर जुळणार नाही या वयात " असं म्हणून आभाळातून दाणकन त्याला जमिनीवर आपटून त्याचा पार कपाळमोक्ष करून टाकतात .
       त्यात भर म्हणून "आता नियमित तपासणी करून घेत जा नाहीतर थेट भरती करावं लागेल एखादया दिवशी " असं बोलून त्याचे पंख पूर्णपणे छाटता नाही आले तरी तो फारसा उडू शकणार नाही याची दक्षताही काही चतुर ललना घेतात .
         सासुरवाडीचं कोणी घरी भेटायला आले की ते स्वतः डॉक्टर असो वा नसो ते पण पन्नाशी नंतर होणारे आजार आणि त्या साठी घ्यायची खबरदारी यावरची माहिती इतक्या आस्थेने देतात की आपल्याला त्यातले बरेच रोग झाले असावेत असं त्यांची लक्षणं ऐकून वाटायला लागतं .
        ते भेटून गेले की " बघा माझ्या माहेरच्यांना किती काळजी आहे तुमची , मुद्दाम भेटायला आले , आता जरा ऐका त्यांचं " असं म्हणून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आहारात होणाऱ्या बदलावर एक प्रदीर्घ व्याख्यान देऊन समारोप केला जातो .
       डाएट वरची निरनिराळी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत तसेच इंटरनेट वरही या विषयावर खूप माहिती उपलब्ध आहे आणि ती कमी वाटली तर आपल्याकडे न मागता सल्ले देणारे रिकामटेकडे काही कमी नाहीत . तसले पदार्थ रोज खाण्यापेक्षा एकदाच काय व्हायचं ते होउदे असं नाही वाटलं तरंच नवल .
        सर्वतोपरी काळजी घेऊनही मधुमेह , थायरॉईड वगैरेची लागण झालीच तर भेटायला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या ओळखीत असलेलं कोणी ना कोणी तरी कसं या आजारात अचानक गेलं याचं भीषण वर्णन करून प्राण कंठाशी कसे येतील याची पुरेपूर काळजी घेते आणि तसं झालं की " पण आता बरीच औषधं उपलब्ध आहेत " असं त्रोटक बोलून जरा दिलासा द्यायचा प्रयत्न करते .
        पुरुष नेमका म्हातारा कधी होतो हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या हितचितकांना विचारणा केली त्यातल्या एकाने दिलेलं उत्तर मला अगदी मनोमन पटलं तो म्हणाला की  " बायकोने संशय घ्यायचं बंद केलं की समजावं आपण म्हातारे झालो " . पण ते जाणून घेण्यासाठी काय करायला हवं याचं उत्तर मात्र त्याने टाळलं ; बघा कोणाकडे असेल तर .

Friday, 3 August 2018